src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

बुधवार, 26 अक्तूबर 2016

Like on post Shiv Chatrapati Jai Bhavani Jai Shivaji

छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्र यांचा संबंध काय असा गैरवाजवी प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी आज्ञापत्रातील शिवरायांचे " ज्याचे आरमार त्याचा समुद्र " हे वाक्य समजून घ्यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काही खालील नोंदी पाहुन घ्याव्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार लहान असले तरी या आरमारात लहान मोठी चार-पाचशे जहाजे होती, गुराबा, तारवे, गलबते, शिबाडे अश्या नाना जातीय जहाजे होती आणि महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचीच काही उदाहरणे-

● का. मिंचिन २२ सप्टेंबर १६७९ ला मुंबई कौंसिलला लिहतो की - खांदेरी बेटावरील लोंकाना आमच्या तोफापासून काही इजा होणार नाही याउलट आमचेच नुकसान जास्त होणार आहे

● २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही

● केजविन लिहतो की २८ ऑक्टोंबरला शत्रुच्या होड्या आमची नजर चुकवून कितीही काळजी घेतली तरी बेटावरील दिव्यांच्या खालून सहज निघून जातात तोच परत १ नोव्हेंबर ला लिहतो की शिवरायांचे आरमार इतके चपळ आहे की ते आमच्या पुढून सहज जातात कारण त्यांच्या लहान होडग्या आम्हाला सहज आणि आश्चर्यरीत्या चुकवतात.

छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती..

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

कोई टिप्पणी नहीं: