src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

गुरुवार, 20 अक्तूबर 2016

शेतकरी असाल तर इस पोस्ट को लाइक करो/



​​​​🌾 *​होय आम्ही शेतकरी​​​​*🌾​​​​

*बागायती  रब्बी ज्वारीचा सुधारित वाण*-- *_फुले रेवती_*

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने बागायती जमिनीसाठी अधिक उत्पन्न देणारी नविन जात " फुले रेवती " संशोधित केली आहे. 
 हा वाण अधिक उत्पादनक्षम असुन ज्या शेतकरी बांधावाकडे पिकास १,२,३ किंवा ४ वेळा पाणी देणे शक्य आहे त्यांच्याकरिता वरदान ठरणार आहे .

 *वैशिष्ट्ये -*

🔸१- हा  वाण  २०१०  मध्ये महाराष्ट्रातील बागायतीखालील मध्यम ते भारी  जमिनीसाठी प्रसारीत केला .

🔸२- हा वाण  CVS -216 × SPV 1502 यांच्या संकरातून निवड पद्धतीने संशोधीत केली आहे .
🔸३- हा वाण बागायती क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीसाठी उपयुक्त .

🔸४- ही जात 118-120 दिवसांत पक्व होते.

🔸५ -प्रचलित वाण फुले यशोदा ,  मालदांडी ३५-१ CSV -18  यापेक्षा  २४.४ , ४१.८  व   ३५.२  % अधिक धान्य उत्पादन देते . 

🔸६ - ह्या वाणाने प्रचलित वाण  मालदांडी ३५-१ CSV -18 आणि फुले यशोदा  पेक्षा २०.६ ,१६.१ व  १५.९ ,% अधिक कडबा उत्पादन अनुक्रमे दिले आहे.

🔸७  -भाकरीची आणि कडब्याची प्रत मालदांडी सारखीच आहे . 

🔸८  - दाण्याचा रंग पांढरा शुभ्र व चमकदार.

🔸९  - या वाणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम असल्यामुळे हा वाण अधिक उत्पन्न देवू शकतो.

🔸१० -  खोडमाशिस प्रतिकारक्षम आहे ..

🔸११  - बीजोत्पादन करण्यासाठी रब्बी हंगाम हा उत्तम आहे. 

🔶 *उत्पादन तंत्रज्ञान*🔶

फुले रेवती या वाणांच्या अधिक उत्पादन वाढण्याच्या  दृष्टीने सुधाय तंत्राचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

अ - योग्य पेरणी वेळी .
ब- पिक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत योग्य पाणी व्यवस्थापन .
क - अंतर मशागत
ड - वेळेवर पिक संरक्षणाचा अवलंब

*लागवडीचे सूत्रे*

🔶१- *जमिन*
      या वाणा साठी निचरा होणारी मध्यम ते भारी  प्रकारची जमीन निवडावी.

🔶२- *पूर्व मशागत* रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करते वेळेस जमिनीची योग्य मशागत करावी . ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास पाणी मुरण्यास मदत होते त्याकरिता नांगरट व कुळव्याच्या पाळ्या इमशागतीचे कामे उतारास आडवी करावी .

🔶३- *पेरणीचा योग्य कालावधी*
      खोड माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी   पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी.

🔶४- *बियाणे व बिजप्रक्रिया*
   प्रती हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणी पुर्वी बियाण्यास गंधकाची प्रक्रीया करावी म्हणजे काणी रोग येत नाही. त्यासाठी एक किलो बियाण्यास ४ग्राम गंधक चोळावे व त्यानंतर १ किलो प्रति बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम ॲझाटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलियम जीवाणू व पी.एस. बी या जीवाणूची प्रक्रिया करावी .

🔶५- *पेरणी पध्दत*
     पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सेमी अंतरावर करुन एकाच वेळी खते व बियाणे दोन स्वतंत्र चाड्यातुन पेरावे. खत खाली व त्यावर बियाणे पडेल अश्या रितीने पेरणी करावे. तसेच दोन रोपातिल अंतर १२  सेमी ठेवावे. 

🔶६- *हेक्टरी रोपांची संख्या*
      ज्वारी उगवन झाल्यानंतर १०-१२ दिवसांनी विरळनी करावी. जेणे करुन हेक्टरी १.८५  लाख इतकी झाडांची संख्या राखली जाइल याची काळजी घ्यावी.

🔶७- *अंतरमशागत*
     पहिली कोळपनी पेरणी नंतर ३ आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी. या कोळपणी मुळे तनांचा बंधोबस्त होवुन मातिचा थर जमिनीवर तयार होवून मातीचे आच्छादन तयार होते. २ऱी कोळपणी पेरणी नंतर ५ आठवड्यानी करावी . त्यामुळे रोपांना मातीचा अधार मिळतो. पिक पेरणी नंतर आठ आठवड्याचे झाल्यावर दातेरी कोळप्याने तिसरी कोळपनी करावी त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजन्यास मदत होऊन जमिनीतिल ओलाव्याचे बाष्पीभवन न होता ओलावा टिकून रहण्यास मदत होते .

🔶८- *रासायनिक खतांचा वापर*
  या वाणास १०० किलो नत्र, ५०  किलो स्पुरद आणि ५० किलो पालाश  प्रती हेक्टरी द्यावे. 
पेरणी करतेवेळेस ५० % नत्र खताची मात्रा आणी संपूर्ण  स्पुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.

संकलन- 
*​श्री. अंकुश जालिंदर चोरमुले​*
*​श्री. अमोल राजन पाटील​*
*​श्री. गणेश आप्पासाहेब सहाने ​*

🔶 ९- पिक संरक्षण 
    *किड नियंत्रण*

*खोडमाशी*- या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस १५ मि. ली. १० ली. पाण्यातुन पहिली फवारणी १२-१४ दिवसांनी करावी पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. किडग्रस्त झाडांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त दिसल्यास ५%निंबोळी अर्काची फवारणी करावी.

*खोडकिडा*- या किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यानंतर क्विनालफॉस १५ मि.  ली. १० ली. पाण्यातून फवारणी करावी किंवा ५% दाणेदार कीटकनाशक १५किलो प्रती हेक्टरी वापरावे . पहिली फवारणी उगवणीनंतर ३० दिवसांनी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर दोन आठवड्यानी करावी. 

🔶 *ऱोग नियंत्रण*

  *काणी* 
 दाणे काणी व मोकळी काणी हे बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार ज्वारिच्या बियाण्याद्वारे होतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी.

१. या रोगाचा प्रसार बियाणांद्वारे होत असल्याने बियाणे रोगमुक्त शेतातून निवडावे.

 २. पेरणीपूर्वी बियाण्यास ३०० मेश पोत्याच्या गंधकाची ४ ग्राम किंवा थायरम ३ग्राम प्रती एक किलो बी या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 

३- मळणीपुर्वी काणीग्रस्त कणसे काढुन नष्ट करावित म्हणजे पुढे रोगाचा प्रसार थांबेल. 

*खडखड्या* 
हा बुरशीजन्या रोग आहे. या बुरशीचा शिरकाव जमिनीतून ताटात होतो . या रोगाच्या प्रादुर्भावाने मुळ्या जवळचा ताटाचा बुंधा नरम पडतो. कालांतराने अशी झाडे कोलमडून जमिनीवर लोळतात .

🚫 *नियंत्रण*
   जमिनीत कमी ओलावा असल्यास या रोगाची लागन मोठ्या प्रमाणात आढळून येत म्हणून पाणी देण्याची सोय असल्यास  शिफारशी प्रमाणे पिकास पाणी द्यावे . पेरणी पूर्वी शेतात शेणखत घालावे. कोळपण्या करुन ओलावा जमिनीत टिकवुन ठेवावा . असमतोल खताची मात्रा देवू नये कोरडवाहू मध्ये पिक ३-४ आठवड्याचे झाल्यावर त्यामध्ये हेक्टरी ५टन तुरकाट्याचे आच्छादन केल्यास रोगाचे प्रमाण कमी होतो आणी ताटे लोळण्याचे प्रमाणही कमी होते . प्रयोगाअंती असे दिसुन आले आहे की आच्छादनामुळे ताटे जमिनीवर पडण्याचे प्रमाण ४२% कमी होवून धान्य उनात १४% वाढ होते.

🔶 *१० - ज्वारीची काढणी*
       हा वाण ११८ -१२० दिवसांत काढणीस तयार होतो. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात . त्याप्रमाणे ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवल काळा ठिपका आढळुन येतो ही लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी. किंवा कणसाचा दांड पिवळा झाला म्हणजे पिक तयार झाले असे समजून कापणी करावी. त्यानंतर मळणी व वाळवणी करुन धान्याची योग्य प्रकारे साठवून करावी .

🔶 *११ उत्पादन*  
या वाणापासुन मध्यम ते भारी जमिनीवर ४० ते ४५  क्विंटल धान्याचे तर ९०  ते १०० क्विंटल कडब्याचे प्रती हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

संकलन- 
*​श्री. अंकुश जालिंदर चोरमुले​*
*​श्री. अमोल राजन पाटील​*
*​श्री. गणेश आप्पासाहेब सहाने ​*

*​​​​​​​​​​​​|| अन्नदाता सुखी भवः ||​​​​​​​​​​​*

अश्याप्रकारची शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ​ ​​​कृषिकिंग​​​​हे ॲप इंस्टॉल करून ​ 

​​होय आम्ही शेतकरी​​​ समूहाची विंडो चालू करा...त्यासाठी प्ले स्टोर वरून कृषी किंग अँप डाउनलोड करून घ्या आणि अँप चालू झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात ​ ​ ​335282101001​ किंवा 1101 ​​​ हा कोड टाकावा.

अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..

​​​​🌾 *होय आम्ही शेतकरी​​​​* 🌾​​​​

https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866 

तसेच ..

आपले कृषिकिंग ॲप डाउनलोड करण्यासाठी .

https://play.google.com/store/apps/details?id=com.reformist.krushiking001


कोई टिप्पणी नहीं: