src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

सोमवार, 24 अक्तूबर 2016

आम्ही शेतकरी हमारा कौन लाइक करेल का लाइक मी फोटो एंड शेयर



 🌾होय आम्ही शेतकरी®🌾

# बागलाण तालुक्यातील श्री नामदेव भामरे
यांनी केला आपल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात वापर #

श्री. नामदेव भामरे
बीएस.सी. एग्री, ए.बी.एम.
पिंगळवडे (कसमादे),
ता. बागलाण (सटाणा), जि. नाशिक

"होय आम्ही शेतकरी" समूहाचे कार्यरत सदस्य असल्याने, समूहाद्वारे दिल्या जाणारया कृषिविषयक शास्ञीय माहीतीचा व स्वतःच्या अनुभवाचा सुरेख सांगम साधून त्यांनी डाळिंब, द्राक्ष बाग फुलवलेली आहे... तसेच परिसरातली शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करून 'उत्कृष्ट शेतकरी' म्हणून स्वतःची एक ओळख बनवली आहे...

त्यांनी आपल्या कष्टातून शेतकऱ्यांना एक आदर्श शेतकरी बनण्याचे आवाहन केले आहे... आपली शेती सांभाळत असताना त्यांनी इतर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींना कसे सामोरे जावे याविषयी सकारात्मक संदेश दिला आहे... तसेच त्यांनी आपल्या बागेत 'तेल्या' रोगावर यशस्वीपणे नियंत्रण केलेले आहे... ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मिरची, कांदा, भुईमूग, द्राक्ष, डाळिंब, पालेभाज्या पिकांबद्दल योग्य असे मार्गदर्शनही करत आहेत...

डाळींबावरील 'तेल्या' रोगाच्या नियंञणासाठी खालील प्रमाणे फवारणीचे नियोजन करावे...
=============================

🌾होय आम्ही शेतकरी®🌾

डाळिंब फळांवरील  तेलकट डाग (तेल्या) रोग व्यवस्थापन

अ ) सुरुवातीस झाडाच्या कोणत्याही भागावर काळपट करडया रंगाचे डाग दिसतास करावयाचे उपाय -

पिक कालावधी मध्ये रोग नियंत्रणासाठी (०. ५% बोर्डोमिश्रणाची परंतु १% छाटणी केल्यानंतर) व त्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लीन (५ ग्राम /१०लि.) किंवा २-ब्रोमो ,२- नायट्रो प्रोपेन १,३-डायोल (ब्रोनोपॉल) (५ ग्राम /१० लि.) + कॉपर ऑक्सिक्लोरीड किंवा कॉपर हाड्रोक्साईडची (२०-२५ ग्राम/१०लि.) पाण्यात संयुक्तरीत्या मिसळून फवारणी करावी.

जर इतर बुरशीजन्य रोग आढळल्यास कॉपर एवजी योग्य ते बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे .

विश्रांती कालावधीमध्ये छाटणीनंतर बोर्डोमिश्रणाची (१%) प्रतिबंधक फवारणी घ्यावी. तसेच आलटून पालटून स्ट्रेप्टोसायक्लीन (२. ५ ग्राम/१०लि.) किंवा ब्रोनोपॉल ५ ग्राम/१० लि. + कॉपर ऑक्सिलोरीड / कॉपरहाड्रोक्साईडची (२०-२५ ग्राम/१० लि.) संयुक्तरीत्या फवारणी करावी .

दोन फवारणीतील अंतर १५ ते २० दिवस ठेवावे.

बागेत स्वच्छता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी) ठेवावी.

प्रादुर्भाव झालेली झाडांची पाने , फळे व फांद्या शेतातून काढून जाळ्याव्यात.

ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने (कि.घ. ३३% क्लोरीन )प्रत्येक ३ महिन्यांनी २५ किलो/१०० लि/हेक्टर पाण्यात मिसळून झाडाखालील मातीत ओतावे.

छाटणी करावयाची अवजारे सोडियम हायपोक्लोईडच्या (२.५%) च्या साहाय्याने निर्जंतुक करावीत.

बागेतील तणे उपटून नष्ट करावीत व बाग तणमुक्त ठेवावीत.

ब ) फळावर काळपट करड्या रंगाचे ठिपके दिसतात, फळावर चिरा पडतात व ते फुटते. प्रादुर्भाव वाढल्यास रोगाचे तेलकट डाग फांद्यावर सुद्धा आढळतात  अशा वेळी,

उपाय :

बहार बदलणे : मृग बहार घेणे टाळावे आणि त्याएवजी कमीतकमी ४-५ वर्ष हस्त बहार घ्यावा.

बागेतील स्वछता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी) आधी दिल्या प्रमाणे करावी.

बागेतील झाडाची छाटणी :
तेल्या रोगाची लागण झाडांच्या इतर फांद्यांवर झाली असल्यास त्यांची छाटणी करावी आणि त्या जाळ्याव्यात.

फांद्याची छाटणी प्रादुर्भाव ग्रस्त भागापासून २-३ इंच खालून करावी.

छाटणी केल्यानंतर त्या भागावर बोर्डो पेस्ट (१०%) लावावी. पावसाळ्यात तेलयुक्त पेस्ट (५०० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड + १ लि. जवसाचे तेल) वापरावी किंवा चौबातीया पेस्ट (१किलो लाल गेरू +१ किलो कार्बोनेट + १. २५ लि. जवसाचे तेल) वापरू शकता.

झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाल्यास ते उपटून काढून टाकावे व त्या जागी नवीन रोप लावावे किंवा त्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासुन २-३ इंच वरून तोडावे आणि नवीन निघणाऱ्या फुटव्यामधून खोड तयार करावे.

रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (५ ग्रॅम. /१०लि.) किंवा ब्रोनोपॉल (५ ग्रॅम/१० लि.)+कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्सिड (२० ते २५ ग्रॅम/१० लि.) ची फवारणी आलटून पालटून बोर्डो /बोर्डोक्स मिश्रणाच्या (०.५ ते १%) च्या फवारणी सोबत करावी.

बागेत घ्यावयाची दक्षता:
गरज असेल तरच फवारणी घ्यावी व रसायने योग्य मात्रेतच वापरावीत अन्यथा जास्त फवारण्यामुळे रोग वाढीस चालणा मिळते.

फवारणीच्या अगोदर सर्व प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून जाळून टाकावीत.

कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा अन्नद्रव्य यांच्या फवारण्या जीवाणू नाशकासोबत एकत्रित करून फावाराव्यात.

पीक कालावधीमध्ये पाऊस पडल्यानंतर लगेचच अतिरिक्त जीवाणूनाशकाची फवारणी करावी.

नेहमी (पाऊस असताना किंवा नसताना)चांगल्या प्रतीचे स्प्रेडर आणि स्टीकर फवारणीमध्ये वापरावेत व बोर्डो मिश्रणामध्ये ते वापरू नयेत.

बोर्डो मिश्रणाचे द्रावण तयार केल्यानंतर त्याचा वापर ताबडतोब करावा (एक दिवसामध्ये).

झाडांना संतुलित अन्नद्रव्ये पुरवावी, तसेच झाडांना ३ ते ४ महिन्याची विश्रांती दयावी आणि झाडांची योग्य वाढ व रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वर्षातून फक्त एकच बहार घ्यावा.

जास्त प्रमाणात (म्हणजेच ६० ते ७०% ) तेल्या रोगाचा प्रादुर्भाव  असल्यास  खालील प्रमाणे स्प्रे करावा.

 ३ ते ४ स्प्रे, ८ ते १० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून...

 स्प्रे 1:    Copper  hydroxide  (2.0g/  l)  +  Streptocycline  (0.2g/l)    +  2-bromo,  2-nitro  propane-1,  3-diol (Bronopol)  @  0.5g  /  l  +  spreader  and  sticker  (0.5ml/l)

स्प्रे  2:  carbendazim  (1g/l)  +  Streptocycline  (0.2g/l)    +  2-bromo,  2-nitro  propane-1,  3-diol  (Bronopol)  @ 0.5g/  l  +  spreader  and  sticker  (0.5ml/l)

 स्प्रे 3:  copper  oxychloride  (2.0g/  l)  +  Streptocycline  (0.5g/l)    +  2-bromo,  2-nitro  propane-1,  3-diol (Bronopol)  @  0.5g  /  l  +  spreader  and  sticker  (0.5ml/l)

स्प्रे 4: Mancozeb  2g/l)  +  Streptocycline  (0.2g/l)    +  2-bromo,  2-nitro  propane-1,  3-diol  (Bronopol)  @  0.5g  /  l +  spreader  and  sticker  (0.5ml/l)

फळे काढल्यानंतर बागेच्या विश्रांती कालावधीमध्ये रोगप्रतिबंधक फवारण्या न चुकता नियमित घ्याव्यात.

या वेळापञकाप्रमाणे नियोजन केल्यास 'तेल्या' रोगावर नियंञण मिळवता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे आणि शेतकरयांनी अशास्ञीय गोष्टींवर विश्वास ठेवून इतर कसल्याही फवारण्या न करता एकजूट होवून अश्याप्रकारे व्यवस्थापन करावे, असे आवाहन केलेले आहे... आजकाल 'तेल्या'वर नियंञण मिळवून देण्याच्या कारण दाखवून अनेक शेतकरी बंधूंना फसवले जात असताना श्री. नामदेव भामरे यांचा हा संदेश डाळिंब उत्पादक शेतकरयांसाठी महत्वाचा मानला जात आहे...

श्री. नामदेव भामरे यांचा तेलासाठी चतुः सूत्री  कार्यक्रम :
१. बागेत स्वच्छता ठेवावी
२. अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन
३. बहर नियोजन
४. कीड व रोग नियंत्रण

अशा प्रकारे त्यांनी तेल्या रोगावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवून आपल्या "होय आम्ही शेतकरी" समूहाची शोभा वाढविली आहे...
समूहातर्फे त्यांचे अभिनंदन...!!

आपणही "होय आम्ही शेतकरी" समूहाद्वारे दिलेल्या आधुनिक शेतीच्या शास्ञीय ज्ञानाचा उपयोग कर असाल तर आम्हाला प्रतिक्रिया अवश्य कळवा... आपली प्रतिक्रीया इतर शेतकरी बंधूंसाठी प्रोत्साहन ठरू शकतो...

|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहिती साठी संपर्क -
श्री, नामदेव भामरे आणि परिवार
पिंगळवडे (कसमादे)
ता. बागलाण (सटाणा),
जि. नाशिक
९४२१९९६७९९

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866


कोई टिप्पणी नहीं: