src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

रविवार, 23 अक्तूबर 2016

एका शेतकर्याने दिलेली माहिती या माहिती ला कितने लाइक मिलते


 🌾होय आम्ही शेतकरी🌾

मका ,मधूमका(स्विटकॉर्न) व बेबीकॉर्न लागवड

मका लागवड
मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन येतो, जसे बीअर, आईसक्रिम, शु-पॉलिश, ग्लु, सिरप, लिहण्याची शाई, फटाक्यांची दारु, बॅटरी, सौंदर्य प्रसाधने, अस्प्रिन वै. मध्ये होत असतो.
मक्याचा उगम झाला मॅक्सिको मध्ये. ७००० वर्षांपुर्वी मक्याची अमेरिका, मेक्सिको, साउथ अफ्रिका येथे लागवड होत होती. १५ व्या आणि १६ व्या शतकात ज्यावेळेस युरोपियन लोकांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित केला त्यानंतर युरोपियन लोक मका त्यांच्या प्रदेशात घेवुन आले. आणि कालांतराने सबंध जगभरात मक्याची लागवड सुरु झाली.
सन २००९ मध्ये सबंध जगभरात मक्याची १५९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली गेली होती. भारत जगातील सन २०१२ च्या आकड्यांनुसार ६ व्या क्रमांकाचा मका उत्पादक देश आहे. अमेरिका मक्याच्या उत्पादनात नंबर १ देश असुन त्यानंतर चिन चा क्रमांक आहे.

जमिन आणि हवामान–
मका पिकांस ४५० ते ६०० मिमी पाऊस मानवतो. सर्वसाधारणपणे दर मिलीमिटर पावसाच्या पाठिमागे १५ किलो मक्याचे उत्पादन मिळते असे आपण म्हणु शकतो. मक्याचे एक रोप त्याच्या जीवनात २५० लि. पाणी वापरते. मका पिकाच्या उगवणीसाठी जमिनीचे १६ ते १८ डिग्री तापमान योग्य ठरते. २० डिग्री सेल्सियस ला मका ५ ते ६ दिवसांत उगवुन येतो. यापेक्षा जास्त जर जमिनीचे तापमान राहत असेल तर मात्र ते उगवणीसाठी हानीकारक ठरते.

मका पिकाच्या रोपांबद्दल –
मक्याच्या मुळ्या –
मका पिकांस तंतुमय मुळ्या असतात. या हजारो मुळांना एकत्र करुन मोजल्यास त्यांची लांबी १५० मिटर पर्यंत भरु शकते. मक्याच्या मुळ्या जमिनीत १ मिटर पर्यंत खोल जातात तर त्या ०.८ मीटर पर्यंत पसरतात. त्यामुळे उत्तम रित्या नरम, कडक न होणारी आणि पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होणारी जमिन मक्यास मानवते.
पाने –
मक्यास साधारणपणे ८ ते २० पाने येतात. पानांच्या वरिल आणि खालिल बाजुस पर्णरंध्रे असतात. पानांच्या खालिल बाजुस जास्त प्रमाणात पर्णरंध्रे असतात. पानांच्या वरिल बाजुस पाणी साठवुन ठेवणा-या मोटार पेशी असतात. ज्यावेळेस मका पिकावर पाण्याचा ताण पडतो त्यावेळेस या मोटार पेशीतुन पाणी वापरले जाते. पाण्याचा ताण असल्यास मका त्याची पाने जमिनीकडे वाकवतात, ज्यामुळे पानांचा कमीत कमी भाग हा सुर्यप्रकाशाकडे असतो.
फुल आणि कणिस –
मक्यास ८ ते २१ पर्यंत पेर असतात. मक्याचे कणिस सर्वसाधारण पणे जमिनीपासुन ८ व्या डोळ्यातुन बाहेर येते. मका पिकांस नर आणि मादी फुले एकाच रोपावर येतात. नर फुलांस मराठीत स्थानिक भाषेत तुरा म्हणतात, हे नर फुल मक्याच्या रोपाच्या टोकाशी येते. तर कणिस हे मादी फुल खोडावर जमिनीपासुन जवळपास आणि बहुतेक करुन ८ व्या डोळ्यातुन बाहेर येते. मक्याचे मादी फुल सर्वसाधारणपणे ३ आठवडे नर फुलांकडुन फलित करुन घेण्यासाठी तयार असतात, मात्र १० दिवसांनंतर यात थोडी फार कमी जाणवते.

बियाणे आणि लागवड –
मक्यापासुन जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी जगभरात अनेक प्रयोग केले जात आहेत. मक्याच्या रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणे, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फुलोरा काळानंतर पाण्याच ताण न पडणे यामुळे मक्यापासुन जास्त उत्पादन मिळवणे शक्य आहे. सर्वसाधारणपणे कोरडवाहु पिकापासुन २४ क्विंटल उत्पादन मिळविण्यासाठी १ एकरात मक्याची ११,२५१ रोप संख्या कायम राखावी. तर ३२ ते ४० क्विंटल उत्पादन बागायती मक्यापासुन मिळविण्यासाठी एकरी रोपांची संख्या १८,५१८ राखावी. ४० क्विंटल पेक्षा जास्त उत्पादनासाठी एकरात २२,२२२ रोप संख्या राखावी. सर्वसाधारण पणे वरिल हिशेबास अनुसरुन मक्याचे १ कणिस किती वजनाचे असावयास हवे ते खालिल तक्त्यात दर्शविले आहे. ठोबळमानाने मक्याच्या एका दाण्याचे वजन १५ टक्के पाणी असतांना ०.२ ग्रॅम भरेल

मक्यापासुन हवे तसे उत्पादन मिळविण्यासाठी
१. मका पिकांस फुलोरा पासुन तर कणीस पक्व होई पर्यंत पाणी, नत्र, स्फुरद आणि पालाश कमी पडु नये.
२. मक्याच्या कणसात कमीत कमी ३० ओळी, भरघोस भरलेले दाणे असलेले असे असावे. यासाठी बोरॉन देखिल कमी पडु नये. याठिकाणी ३० ओळी ह्या कमीत कमी गृहीत धरल्या आहेत, यापेक्षा जास्त ओळी असल्यास उत्पादनात नक्किच वाढ होईल.
३. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन –
पक्वतेच्या वेळेस मक्याचे एक रोप ८.७ ग्रॅम नायट्रोजन, ५.१ ग्रॅम फॉस्फोरस आणि ४ ग्रॅम पालाश शोषुन घेत असते. १००० किलो मक्याच्या उत्पादनासाठी १५ ते १८ किलो नायट्रोजन, २.५ ते ३.० किलो फॉस्फोरस आणि ३ ते ४ किलो पालाश चा वापर होतो. मका पिक सी-४ गटातील प्रकाश संश्लेषण करणारे पिक आहे, या गटातील पिके हवेतील कार्बन डाय ऑक्साईड त्यांच्या शरिरात साठवुन ठेवतात. त्यामुळे मका इतर कोणत्याही पिकापेक्षा जास्तीत जास्त प्रमाणात प्रकाश संश्लेषण करु शकते.
मका पिकांत स्टार्च चे प्रमाण जास्त असल्या कारणाने या पिकांस स्टार्च बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडतील अशी अन्नद्रव्ये फुलोरा काळापासुन तर कणीस पक्व होई पर्यंत गरजेची आहेत.
मका पिकांस झिंक या सुक्ष्म अन्नद्रव्याची देखिल जास्त गरज भासते. मका पिकांस रासायनिक खतांतुन अन्नद्रव्ये द्यावीत.

पाणी व्यवस्थापन –
मका पिकांस वाढीचा काळ, फुलोरा काळ आणि दाणे भरण्याचा काळ, या काळात पाणी कमी पडु देवु नये. मका पिक जर उन्हाळी किंवा हिवाळी हंगामात घेतले जाणार असेल तर, पाण्याचे नियोजन करावे.

मका पिकांस फुलोरा काळात पाणी कमी झाल्यास नर फुले असलेला तुरा सुकुन जातो, ज्यामुळे कमी दाणे भरतात. तर दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी झाल्यास त्यामुळे दाणे कमी प्रमाणात भरले जातात.

तण व्यवश्तापन –
कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे

उगवणीपुर्वी वापरावयाची तणनाशकेतणनाशककेव्हा वापरावेअलाक्लोरपेरणी केल्यानंतर पाणी देण्यापुर्वी किंवा पावसाच्या ७ दिवसांच्या आत वापरावे. जमिनीत २ ते ३ इंच खोलीवर गाडुन टाकावे.अट्राझिनवापरावंतर १८ महिने ज्वारी आणि मक्याच्या व्यतिरिक्त दुसरे पिक घेवु नये.ग्लाफोसेटउगवुन आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्तपेंडीमेथिलिनलागवडीच्या ७ ते १० दिवस अगोदर वापरावे. उगवुन आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी फारसे उपयोगी ठरत नाही.लागवडीनंतर वापरावयाची तणनाशके२-४-डीमका पिकाच्या जमिनीजवळील खोडास सरळ आणि जाड मुळी फुटली असल्यास वापर करु नये. मक्याच्या रोपावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.पेंडीमेथिलिनतण उगवणीपुर्वी वापरावे. मका पिकाच्या जमिनीजवळील खोडास सरळ आणि जाड मुळी फुटली असल्यास वापर करु नये. मक्याच्या रोपावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.पॅराक्वेटमका १० इंच वाढलेला असतांनाच वापर करावा. मक्याच्या पानांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.

(संदर्भ – मेझ – इन्फोपॅक, साउथ अफ्रिका, मेझ- विकिपिडिया, फुड आणि अग्रीकल्चर ऑरगनायझेशन, कॅलिफोर्निया युनिव्हीर्सिटी, म.फु.कृ.वि. राहुरी)

स्विट कॉर्न (मधु मका) लागवड –
शेतात लावण्यात येणा-या मक्या च्या कणसातील स्टार्च युक्त दाण्यांना बाजारात फारशी मागणी नसते. जनुकिय तंत्रज्ञानाचा वापर करुन, मक्याच्या दाण्यात स्टार्च ऐवजी केवळ साखर तयार होईल अशी योजना करुन स्विट कॉर्न ची निर्मिती केली गेली. काढणीस जास्त कालावधी लागल्यास स्विट कॉर्न मध्ये देखिल मात्र साखरेची रुपांतर स्टार्च मध्ये होते.

जमिन आणि हवामान –
स्विट कॉर्न साठी भुसभुशित, आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन मानवते. स्विट कॉर्न पिक मातीच्या सामु नुसार वाढते, मात्र सामु ६.० ते ६.५ असल्यास उत्तम पिक मिळते. उगवणीसाठी २० ते २५ डिग्री सेल्सियस तापमान योग्य ठरते. थंड वातावरणात लागवड करु नये.
स्विट कॉर्न ची लागवड करतांना साधा मका, किंवा इतर दुस-या स्विट कॉर्न जातीच्या मक्याची ७०० फुट अंतरापर्यंत लावड करु नये, तसेच दोघांची फुलोरा एकाच वेळेस येईल अशा प्रकारे लागवड करु नये. स्विट कॉर्न हे साधारणतः ७० ते ९० दिवसांचे पिक आहे.
उपलब्ध वाण –
मका पिकातील एस यु, एस ई, एस जे २, ए ई, डि यु, डब्ल्यु एक्स हे जीन्स साखर निर्मितीसाठी कार्य करतात. स्विट कॉर्न च्या दाण्यात कोणते जीन्स आहेत आणि कणासातील किती टक्के दाणे सदरिल जीन्स नुसार विकसित केलेले आहेत यानुसार स्विट कॉर्न च्या जाती विकसित केल्या गेल्यात.
१. स्टॅडर्ड स्विट – एस. यु , एस.यु.
२. अंशतः विकसित वाण –
अ. सिनर्जीस्टिक किंवा शुगरी सुपर स्विट (कणसातील कमीत कमी २५ टक्के दाणे विकसित – एस.यु, एस. ई. जीन्स) - हनी कॉब्म, गोल्डन नेक्टर, शुगर लोफ, शुगर टाईम
ब. शुगर एनहानस्ड किंवा ए एच – (एस. यु, एस ई) – प्लॅटिनम लेडी, सिल्व्हर प्रिन्स, कॅन्डी कॉर्न इएच, मेनलाईनर इएच, व्हाईट लाइचनिंग, अर्ली ग्रो इएच, गोल्डन स्विट इएच, सेनेकासेंट्री, टेंडरट्रिट इएच.
३. पुर्णतः विकसित वाण – (प्रत्येक दाण्यावर एस यु, एस इ) – मिरॅकल, रिमार्केबल, डबल ट्रिट, डबल डिलिशियस, डेव्हीनिटी.
४. एस यु च्या ऐवजी बहुतांश एस एच २ हा जीन – इलिनी चिफ एक्स्ट्रा स्विट, क्रिप्स अँड स्विट, कॅन्डीमॅन, अर्ली एक्स्ट्रा स्विट, नॉर्दन स्विट, कॅन्डी बार, बुर्पी शुगर स्विट, डिनर टाईम.
५. एस यु च्या ऐवजी ए ई, डि यु, डब्ल्यु एक्स हे जीन्स – ए डी एक्स हायब्रिड आणि पेनफिक्स ए डी एक्स.
६. ट्रिपल स्विट – (एस यु आणि एस इ २ जीन्स प्रत्येक दाण्यावर) – हनी सिल्केट बोन अँपेटाईट, आणि सेरेनडिपिटी.

स्विट कॉर्न लागवडीनंतर ज्यावेळेस रोप २० इंच वाढते त्यावेळेस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.
बेबी कॉर्न –
स्विट कॉर्न च्या खोडावरिल सर्वात वरिल कणीस ठेवुन खालचे कणीस (सर्व साधारणपणे ८ से.मी. लांब) हलक्या हाताने काढावे. हे कणीस बेबी कॉर्न म्हणुन विकता येते.
रोग आणि किड व्यवस्थापन –
स्विट कॉर्न पिकावर खालिल प्रमाणे रोग दिसुन येतात.
१. डाऊनी मिल्ड्यु – नियंत्रणासाठी कॉपर फंजीसाईड, मेटालॅक्जिल, मँन्कोझेब, कॅपटन वै. बुरशीनाशके वापरता येतात.
२. हेलमॅन्थोस्पोरियम लिफ स्पॉट आणि रस्ट – मॅनेब किंवा झिनेब चा वापर करावा.
३. बॅक्टेरियल स्ट्राईप आणि लिफ ब्लाईट – दमट वातावरणात पिक असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव दिसन येतो. नियंत्रणासाठी कॉपर युक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी.
|| अन्नदाता सुखी भवः ||

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा

🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866



कोई टिप्पणी नहीं: