src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

रविवार, 23 अक्तूबर 2016

लाइक द पोस्ट ओन्ली शेतकरी

 "होय आम्ही शेतकरी" समूहाच्या ४ नंबर व्हाटस् ग्रूपमध्ये समाविष्ट असणारया श्री. श्रिनिवास खंदारे पाटिल यांची प्रतिक्रीया त्यांच्याच भाषेत...

💐💐सर्व प्रथम "होय आम्ही शेतकरी" ग्रुप अँडमीन(प्रबंध)चे हार्दिक आभार 💐💐

मी गेले एक वर्षा पासुन या ग्रुप मध्ये आहे. सर्व प्रथम विनायक सर, सुर्यवंशी सर, अंकुश सर व सर्व प्रबंधांचे हार्दिक आभार. कारण सर तुम्ही जे मार्गदर्शन करत आहेत ते मार्गदर्शन या शेतकरी बांधवांसाठी खुप महत्वते आहे. कारण सर आपन जी माहिती सामगता ती पुर्नपने शास्ञीय माहिती आहे.
          त्या बद्धल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आम्ही गेले वर्षी हळदीमद्धे पपई हे अंतर पीक घेतले तर आम्हाला या ग्रुप चे खुप चांगले मार्गदर्शन लाभले. कृषि क्षेत्रात शिकलेल्या प्रतेक व्यक्ति कडुन शेतकर्याना असे चांगले मार्गदर्शन मिळाले तर शेतकरी राजा खुप चांगल्या प्रकारे शेती करून जास्त प्रमानात उत्पादन काढू शकतो.

हळदीला अंतर पिक पपई बनले उत्पन्ना चे साधन.

वसमत तालुक्यातील हिरडगाव येथील शेतकरी सुभाष खंदारे पाटील हे गेल्या वर्षी पासुन किमान एक ते दिड एकर शेतावर हळदी सोबत पपई हे अंतर पीक घेतात. हळदी मध्ये 1200 पपई च्या झाडापासुन आत्ता पर्यत 210 क्विंटल (21टन) पपई ची विकृी केली आहे. आणि चालु हंगामातील पपई आनखी 5-6 महीने फळे देते. पपई चे अंदाजे सर्व उत्पादन 450 क्विंटल (45टन) अपेक्षीत आहे. शिवाय त्या दिड एकर मध्ये गेले वर्षी 25 क्विंटल हळद शुद्धा झाली आहे. हे शेतकरी अतीशय चांगल्या पद्धतीने शेती चे नियोजन करुन शेती करतात. आणी त्यांचा मुलगा श्रीनिवास याची बी.एसी कृषि झाली आहे.हा पन त्यांना नियोजन करण्यास मदत करते.

शेतीचे नियोजन :-
                             एकुन 25 एकर शेती आहे त्या मध्ये प्रमुख पिके. 1.5एकर पपई, 6एकर हळद, 7एकर कापुस आणि 8एकर सोयाबीन. हे प्रमुख पिके असतात व सोबत मुग /उडीद हे अंतर पिक घेतात.

पपई पिकाचे नियोज:-
                                 ज्या शेतावर हळदी सोबत पपई ची लागवड करायची आहे त्या शेतामध्ये सर्वप्रथम नांगरनी करून त्यात 12-15 टन चांगले कुजलेले शेनखत पसरुन रोटवेटर करूनती जमीन लागवड करण्यास तयार होते. त्या नंतर मे महीण्याच्या अखेरीस हळदी साठी 4.5 x 4.5 असे बेड पाडले जातात व त्या वर ठिबक अथरुन जुन महीण्याच्या पहील्या आठवड्यात त्या बेड वर हळदी ची लागवड केली जाते.
                                                         त्या नंतर जुले महिन्यात हळदीची सर्व कामे करून घेतली जातात जसे कि खुरपने, खत देने,माती लावने. व आँगस्ट महीन्याच्या पहील्या आठवड्यात सोलापुर येथुन आनलेल्या पपई च्या रोपांची हळदीच्या सरी मध्ये 5x10 या पद्धतीने लागवड केली जाते.
       
पपई रोपाची लागवड :-
                                   लागवड करते वेळेस पृती झाडाच्या खड्यात Blue Copper दीले जाते त्या मुळे मुळ कुज होत नाही. आणी सोबत लेंडी खत व 100 gm 10:26:26 हे खत दिले जाते. या शिवाय ठिबकच्या माध्यमतुन 18:46:00 व 0052:34 ही खते वेळो वेळी दिली जातात. आणी या वर्षी आनखी 1800 झाडांची लागवड केली आहे.

पाणी व्यवस्थापन :-
                               पाण्यासाठी एक विहीर व एक बोरवेल आहे. गेले वर्षी दुष्काळ असल्यामुळे पाण्याची कमतरता भासली पन ठिबक असल्यामुळे पाणी व्यवस्थापन करणे सोपे झाले. उन्हाळ्यामध्ये एका दिवशी एका झाडाला 5ली पाणी भेटेल अशी व्यवस्था केली होती. शिवाय पाण्याबरोबर गोमुञ ही दिले जाते त्या मुळे पाने गर्द हिरव्या रंगाची राहतात व रोग येत नाही.

रोग व्यवस्थापन :-
                           पपई वर येनारा पृमुख रोग म्हणजे यलोव्हेन मोझँक होय. परंतु बाग स्वच्छ असल्यामुळे हा रोग आला नाही. त्या रोगाच्या नियोजनासाठी शेनकाला रबडी दिली. हि रबडी तयार करण्यासाठी 100 की.शेन 400 ली.पाण्यात भिजत घालावे. शेनाबरोबर 10kg फेरस सल्फेट, 10kgमैग्नीशियम सल्फेट, 10kgबोराक्स मिसळावे हे मिश्रण काठीने हलवुन चांगले एकजीव करावे व 24 तास सावलीत ठेवावे व नंतर वापरताना यात पुन्हा 600 ली पाणी मिसळुन ते पृतेक झाडाला एक लीटर द्यावे. या प्रक्रियेत झाडाला सर्व सुक्ष्म अन्नद्रव्य मिळतात.
                 हि शेनकाला रबडी ची माहीती आम्हाला महाराष्ट्रात चालु असलेल्या "होय आम्ही शेतकरी "या वाट्सअप ग्रुप मध्ये मिळाली आहे. हि शेनकाला रबडी पपई पिकाला खुप महत्वाची आहे. त्या बद्धल विनायक शिंदे पाटील (P.hd Horticultur)त्यांचे व त्यच्या ग्रुपचे हार्दिक आभार.

विक्री व्यवस्थापन :-
                                 पपई ची विक्री ही आम्ही स्थानीक बाजारात करत नाहीत. तर व्यापारी मार्फत वसमत, परभणी, औरंगाबाद अशी केली जाते. व्यापारी हे स्वत: शेतावर येवून माल घेउन जातात तर या वर्षी सर्वसाधारन 14 रुपये प्रती असा भाव मीळाला आहे. माञ व्यापारी हे स्वत: फळे कापतात, रद्दी कागद लाउन पँकींग करतात. फक्त त्यांनी पँकींग केलेली फळे ट्रैक्टर ने मुख्ख रस्त्यापर्यंत आनुन देण्याचे काम करावे लगते. सगळ्यांचा सरासरी दर 18 ते 20 रुपये प्रती किलोला पडतो.

पपई व हळदीचे आर्थिक गणित :-
1. शेत नांगरने व अतर मशागत -15000
2.रोप खरेदी                             -1500
3.लागवड व खत देने                -10000
4.सेंद्रीय व रासायनिक खते       -25000
5.किटक नाशक                       -5000
6.इतर                                      -12000
7.काढणी व व्रिक्री                    -20000
     
               एकुन खर्च          -97,000    
हळद उत्पादन                      -210,000
पपई उत्पादन  :-
     प्रती झाडास 40 की. फळे प्रमाणे      
      1200 झाडा पासुन             :-480 क्विं
                                                  (48 टन)
सरासरी  14 रु  प्रति किलो
  एकुन उत्पन्न(पपई)                  :-630000
   एकुन उत्पन्न(हळद)                :-210000
                                               _________
        एकुन टोटल                   :-840000
         खर्च                             -97000
  निव्वळ उत्पादन                 743000
     
                 ।। धन्यवाद।।
संपर्क - सुभाष खंदारे पाटील
          श्रीनिवास सुभाषराव खंदारे पाटील
                             ( B.sc Agricultural)
            Mo.no.-9765588106
                        -9657973069


कोई टिप्पणी नहीं: