src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

शुक्रवार, 21 अक्तूबर 2016

Like mi & share शेतकर्याला कौन लाइक करेगा


🌾 *होय आम्ही शेतकरी* 🌾

🌰 _*अंजीराचा मीठा बहार धरताना*_ 🌰

अंजीर बागेचा जोम प्रभावी 
राखण्यासाठी व चांगल्या प्रतीची अधिक फळे मिळण्यासाठी कोणत्याही एकाच बहरात स्थानिक हवामानाप्रमाणे उत्पादन घेणे फायद्याचे ठरते, असे संशोधनातून दिसून आले आहे. अंजीर बागेस दोन वेळा फळ बहर येतो. पावसाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला"खट्टा बहर' आणि उन्हाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला "मीठा बहर' म्हणतात.

*मीठा बहराचे व्यवस्थापन -*

🌰 या बहरामध्ये जून ते ऑगस्ट पूर्ण विश्रांती दिली जाते. स्थानिक हवामानाप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये बागेची खोल चाळणी व छाटणी करतात. अंजीर आगारातील चाळणीचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत बागेस मीठा बहराचे पहिले पाणी देण्यात येते. सदर बहराची फळेफेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतात. या बहराची फळे प्रतवारीप्रमाणे उत्तम असतात. साखरेचे प्रमाण 16 ते 19 टक्के असते. फळांचे सरासरी वजन 60 ते 90 ग्रॅम, अंजिरीरंगाची आकर्षक फळे मिळतात.

🌰यंदा अंजीर उत्पादक पट्ट्यात पर्जन्यमान चांगले असल्यामुळे अंजीर उत्पादन या वर्षी चांगले मिळणार आहे.

🌰अंजीर बागेत संजीवकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेपुरताच व योग्य वेळी करावा. संजीवकांचा अतिरेकी वापर टाळावा. त्याचे झाडावरविपरीत परिणाम होतात. अंजीर झाडाचे सर्व डोळे फुटून येण्याकरिता व अधिक उत्पादन मिळविण्याकरिता 20 मि.लि. हायड्रोजन सायनामाईड (50 टक्के एस.एल.) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा फांद्यांना व खोडाला चोळावे, त्याच दिवशी बागेस बहराचे पाणी सुरू करावे.

🌰अंजीर बहर घेणार तेथील स्थानिक तापमान, हवेतील आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाऊस, पावसाचे एकूण दिवस, अवकाळी पाऊस, धुके, गारा, वादळ, वारा या बाबींचा अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे.

🌰ओलसर, दमट हवामान या पिकास घातक ठरते. स्थानिकहवामानाचा अभ्यास करूनच बहराचे पाणी केव्हा सुरू करावयाचे याचा निर्णय घ्यावा.

🌰बदलत्या हवामानाप्रमाणे अंजीर पिकाची थंडीमध्ये निगा घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, त्यासाठी बागेची स्वच्छता, झाडांचे पोषण, पाणी व्यवस्थापन, थंडीपासून संरक्षण, कीड व रोग व्यवस्थापन या सर्व बाबींकडे लक्ष दिले तरच बाग तग धरते.अंजिराच्या झाडास उष्ण व कोरडे हवामान मानवते.

🌰अंजिराचे झाड अति कमी उष्णतामानात तसेच अति हिवाळ्यात सुप्त राहून स्वतःचा थंडीपासून बचाव करते. जेव्हा तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते, त्या वेळी पानांची व फळांची गळ सर्वत्रच आढळून येते. सदरच्या हवामानातील बदलामुळे उत्पादनात 60 ते 70 टक्क्यांपेक्षा अधिक घट येत असल्याचे दिसून आले आहे.

🌰हवामानातील बदलाचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर वाईट परिणाम झालेला दिसून येत आहे. बदलत्या हवामानात झाडाची, पानांची व फळांची समाधानकारक वाढ होत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कमाल व किमान तापमानातील मोठी तफावत अंजीर बागांना सहन होत नाही.

🌰अंजीर बागेस बहर धरत असताना भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतामध्येशेणखत, कंपोस्ट खत, निंबोळी पेंड, करंज पेंड किंवा इतर उपलब्ध पेंडी, माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद व पालाश यांची संतुलित मात्रा द्यावी. गरजेनुसार परत मुख्य व सूक्ष्म घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रति झाड 900 ग्रॅम नत्र ः 250 ग्रॅम स्फुरद ः 275 ग्रॅम पालाश अशी शिफारस केलेली आहे. माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा वापर करावा.

🌰बहराचे पाणी सुरू केल्यानंतर नवीन फुटी एक ते दीड फुटापर्यंत वाढल्याबरोबर त्वरित दोन मि.लि. सायकोसील प्रति लिटर पाण्यातून दोन वेळा पाच दिवसांच्या अंतराने फवारावे. असे केले असता झाडाची वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत तर होतेच, त्याशिवाय फळेदेखील दर्जेदार घेता येतात. अंजीरझाडांची वाढ नियंत्रित असल्यास फळांची तोडणीदेखील सुलभ होते.

🌰अंजीर फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी किंवा खांदणी करण्याची पद्धती अंजिराच्या आगारात दिसते. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाण्याची पाळी देण्यात येते, त्यामुळे झाडे जोमदारपणे वाढू लागतात व फळांचे आकारमान सुधारते व सदर बागेतून दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते.

🌰अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. अंजीर फळांच्या वाढीच्या काळात रासायनिक खतांचा वापर टाळावा. खतांच्या वापरामुळे पक्व फळांची टिकाऊ क्षमता कमी होते व फळे लवकर खराब होतात. अंजीर फळाच्या सालीवर त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येतात, याकरिता रासायनिक खतांचा वापर फळे पक्व होण्याच्या अवस्थेपासून टाळावा. सेंद्रिय खते, संजीवके, सिलिका व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करून फळांचा टिकाऊपणा काही दिवस वाढविता येतो.

🌰अंजीर बागेस आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. शक्यतो बाग वाफशावर असताना पाणी देणे गरजेचे असते. अति पाण्याचा वापर टाळावा. बागेत सतत ओलावा राहणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे.

🌰अंजीर बागेस सूत्रकृमींचा उपद्रव आहे की नाही याची प्रत्येक वर्षी तपासणी करणे गरजेचे आहे, त्यासाठी मुळ्यांचा व मातीपरीक्षण अहवाल गरजेचा आहे. अंजीर बागांची पाहणी केली असता 40 ते 50 टक्के अंजीर बागांमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसतो आहे. याच्या नियंत्रणासाठी प्रति झाड 50 ते 100 ग्रॅम "ट्रायकोडर्मा प्लस' शेणखत किंवा गांडूळ खतातून जमिनीमध्ये दिल्यास सूत्रकृमींचे प्रभावी नियंत्रण होते.

🌰काही अंजीर बागांची पाहणी केली असता बागेवर तांबेरा रोगाचा उपद्रव आढळून आला आहे. तांबेरा रोगाच्या नियंत्रणाकरिता बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा दोन ग्रॅम क्लोरोथॅलोनील (75 टक्के) अधिक एक ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 टक्के) किंवा तीन ग्रॅम मॅन्कोझेब (75 टक्के) अधिक एक ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 टक्के) प्रति लिटर पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने रोगाची तीव्रता पाहून फवारावे.

🌰अंजीर बागेवर हिरवे तुडतुडे, फुलकिडे, खवले कीड, पांढरे ढेकूण, पाने खाणारी अळी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसतो. या किडीच्या नियंत्रणासाठी दोन मि.लि. मॅलेथिऑन (50 टक्के ई.सी.) किंवा दोन मि.लि. डायमिथोएट (30 ई.सी.) किंवा दोन ग्रॅम ऍसिफेट (75 टक्के डब्ल्यू.पी.) प्रति लिटर पाण्यातून दहा दिवसांच्या अंतराने किडींचा उपद्रव दिसताच फवारणी करावी.

🌰पूर्ण वाढ झालेल्या "पूना अंजीर" या जातीचे मीठा बहरामध्ये सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मे या महिन्यांत 70 ते 90 किलो प्रति झाड उत्पादन मिळते.

*संपर्क -* _*डॉ. खैरे*_ 9371015927,
(0231) 2605851 किंवा 2605852
(लेखक कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.)

_*संदर्भ - एग्रोवन*_

कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो... त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात "इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)" या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे... तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या... मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो... या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते... आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही... मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका...

_*|| अन्नदाता सुखी भवः ||*_

अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा, आपल्या परिचितांनाही याबद्दल नक्की सांगा... आपले लेख आहे तसे शेअर करा...
🌾 *होय आम्ही शेतकरी* ®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866


कोई टिप्पणी नहीं: