src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

रविवार, 23 अक्तूबर 2016

लाइक फोटो ओन्ली शेतकरी एका शेतकर्याला कितने लाइक मिलते थे बघुया



 _*नमस्कार...*_

*'होय आम्ही शेतकरी' समूह नंबर १ चे सदस्य असणारया श्री. कायदेव महाडीवाले या शेतकरीबंधूंची प्रतिक्रीया, त्यांच्याच शब्दात...*

सर्व प्रथम प्रबंधकाची माफी मागतो.

खर तर शेती म्हणजे घर जाळुन कोळश्याचा व्यापार करण्यासारख वाटायचा कारण वडील शेती करायचे व बागायती शेती असुन सुध्दा एका सिझन मध्ये दहा हजार सुध्दा शिल्लक रहायचे नाहीत, ब-याचदा तर आमदनी आठण्णी व खर्चा रूपय्या अशी परिस्थीती यायची मग पुढील सिझन साठी सावकार धावा करावा लागायचा, वडील खते बियाणासाठी सावकाराकडे चकरा मारायचे यामुळे शेती नकोच त्यापेक्षा कुठेतरी दुकानात नोकर राहीलेले बर वाटायचं
त्यातच सरकारी नौकरी मिळाली व शेतीचा असलेला संपुर्ण संपर्क तुटला.

असे असलेतरी शेतीत काहीतरी बदल करायचा ध्यास मनात सतत होता. त्यामुळे इंटरनेट व फेसबुकवर शेती विषयक काही मिळते का याची उत्सुकता होती. यातुनच साधारण ऑगस्ट 2015 मध्ये फेसबुकवर *होय आम्ही शेतकरी*  नावाच्या पेजला जाॅईन झालो आणि शेती बाबत वाटणा-या विचारात अमुलाग्र बदल झाला. मग होय आम्ही शेतकरी पेज वरील सर्व लेख काॅपी करून त्याचे प्रिंट्स काढण्याचे व्यसनच लागले. त्यानुसार बियाणे, खते,औषधे खरेदी करणे सुरू झाले. व शेतीची खरी आवड निर्माण झाली ती होय आम्ही शेतकरी परीवारामुळे. यापुर्वी दुकानदार देईल ते बियाणे, खते, औषधे वापरत असु मात्र होय आम्ही शेतकरी परीवारामुळे अस्सल बियाणे खते औषधे काय असतात याची माहिती झाली. मग दुकानदार देईल ते यात बदल होऊन मी मागेल ते दुकानदार देऊ लागला.

पेज वरील माहिती वाचुन जानेवारी 2016 मध्ये 30 गुंठे टोमॅटो ची लागवड केली. तो पर्यंत होय आम्ही शेतकरी च्या व्हाट्स अॅप ग्रुपला जाॅईन झालो होतो. वेळोवेळी झाडावर आलेले रोगाबाबत फोटो काढुन ग्रुपवर टाकल्यावर त्यावर फावारणी करायच्या औषधाची माहिती तात्काळ मिळत होती. तर कधी ग्रुप मधील इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नातुन माझ्या अडचणी सोडवल्या जायच्या. वातावरणानेही चांगली साथ दिली आणि 30 गुंठ्यात तब्बल 1000+ कॅरेट माल काढता आला. ज्या शेतात वर्षभरात दहा हजार मुस्कील होते तिथे केवळ चार महीन्यात चार लाख रुपयाचे उत्पंन्न हाती आले. खर्च वजा जाता तिन लाख रू शिल्लक होते.

वडील म्हणाले विनायक सर, चोरमुले सर, गाढेकर सर व टिम यांना आपल्या शेतावर बोलव त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेऊ व अमोल पाटील सरांची शेती पहायला जाऊ या.

खर तर शेती पासुन दुर चाललेल्या माझ्या सारख्या कितीतरी जणांना या टिमने शेतीत उतरायला भाग पाडलं. इतकंच नाही तर शेतीतील अंधश्रद्धा, औषधांचा अतिरेकी वापर, व सर्वात महत्वाचे म्हणजे शेतक-यांची होणारी फसवणूक व लुटमार या ग्रुपचे प्रबंधकांनी थांबवली. महाराष्ट्रातील जाणता शेतकरी आपले ऋण कधीही विसरणार नाही. त्यामुळे प्रबंधकाचे मनःपूर्वक आभार. 🙏�

- के. व्ही.महाडीवाले
बाराहाळी जि.नांदेड.
9823471219

_*||अन्नदाता सुखी भवः||*_

*होय आम्ही शेतकरी* समूहाद्वारे दिली जाणारी शेतीविषयक शास्ञिय माहिती मिळवण्यासाठी आजच *कृषिकिंग* हे ॲप इंस्टॉल करून समूहाची _*विंडोव*_ चालू करा... अधिक माहीतीसाठी आपले _*फेसबूक पेज लाईक करा*_ व आपल्या परिचितांनाही याविषयी नक्की सांगा...

🌾 *होय आम्ही शेतकरी* ®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866



कोई टिप्पणी नहीं: