src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

बुधवार, 26 अक्तूबर 2016

Like no post only शेतकरी



 ​🌾 *होय आम्ही शेतकरी* 🌾​

*_सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान_*

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

 गहू हे रब्बी हंगामातील महत्वाचे अन्नधान्याचे पीक आहे...भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (3120 किलो/प्रति हेक्टर) तुलना करता महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन 1461 किलो प्रति हेक्टर एवढेच आहे.. नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवण्याची आज गरज आहे... सदरच्या लेखात आपण या बाबींवर माहिती घेऊ..
*जमीन-*
 बागायती गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माध्यम जमिनीत भारखते आणि रासायनिक खते वापरल्यास चांगले उत्पादन भेटू शकते. जिरायत गहू जास्त पाऊस पडणाऱ्या आणि ओलावा टिकून धरणाऱ्या जमिनीत घ्यावा..
*सुधारित वाण-*
 NIAW-301(त्र्यंबक), NIAW-917(तपोवन) NIAW- 1914 (समाधान) हे सरबती वाण आणि  NIDW-215 (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावेत. बागायती उशिरा पेरणीसाठी NIAW- 34 या वाणाची लागवड करावी. जिरायत पेरणीसाठी  NIDW-15 (पंचवटी) AKDW-2997-16 (शरद) हे वाण उपयुक्त आहेत..
*_पेरणीची वेळ-_*
 *जिरायत गव्हाची पेरणी* ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवढ्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची वेळ म्हणजे नोव्हेबरचा पहिला पंधरवढा होय. या वेळेत पेरणी केल्यास उत्पादन चांगले भेटते..
बियाणे व बीजप्रक्रिया
 बागायती गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे..जिरायती गव्हाच्या पेरणीसाठी  हेक्टरी 75 ते 199 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे..गव्हाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी 20 ते 22 लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे..
पेरणिपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी..तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम Azotobactaor व पीएसबी २५० ग्रॅम या जिवाणू सवर्धकांची खताची बीजप्रक्रिया करावी..
*पेरणी-*
 बागायती गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २०सेमी, व उशिरा पेरणीसाठी १८ सेमी ठेवावे.. जिरायत गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २० सेमी ठेवावे..

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*_खत व्यवस्थापन_*
*बागायती गहू-*
१२०:६०:४० किलो npk द्यावे(प्रति हेक्टर). निम्मे नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेराणीवेळी द्यावे  व उरलेले नत्र ३ आठवड्यानी खुरपणी झाल्यावर द्यावे..
*जिरायत गहू*
४०:२०:० किलो npk हेक्टरी द्यावे.. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 2% यूरिया ची फवारणी करावी.
*पाणी व्यवस्थापन*
 माध्यम ते भारी जमिनीत ४ ते ५ पाण्याच्या पाळ्यात पीक निघते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते त्या खालील प्रमाणे
मुकुट मुळे फुटण्याची अवस्था- पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
कांडी धरण्याची अवस्था- पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
फुलोरा आणि चिक भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ६० ते ६५दिवस
दाने भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
*अंतर मशागत*
गव्हातील तणांच्या नियंत्रणासाठी जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी हेक्टरी आयसोप्रोट्युरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेट सल्फ्युरॉन मेथाईल (२०%) हेक्टरी २० ग्रॅम किंवा २,४ डी (सोडियम)अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून २ ओळीत फवारावे.

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*_पीक संरक्षण:_*

*तांबेरा:*
 गहू या पिकावर काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहेत. नियंत्रणासाठी तांबेरा प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक म्हणून गव्हाची पेरणी वेळेत करावी. तांबेरा दिसू लागताच मन्कोझेब हे बुरशीनाशक हेक्टरी १.५ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जरुरी भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
 मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्लूजी ५० ग्रम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*कापणी व मळणी:‌‍*
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस जास्त उशीर झाल्यास त्रंबक या वाणाचे दाने झडू शकतात. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५% असावे.
*उत्पादन:*
बागायती वेळेवर केलेली लागवड : ४५ ते ५० क्विंटल
बागायती उशिरा  केलेली लागवड: ३५ ते ४० क्विंटल
जिरायत लागवड : १२ ते १४ क्विंटल

*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*

*​​​​​​​​​​​​​​​​​​|| अन्नदाता सुखी भवः ||​​​​​​​​​​​​​​​​​*

अश्याप्रकारची शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ​ ​कृषिकिंग​ ​​​​हे ॲप इंस्टॉल करून ​

*​​​होय आम्ही शेतकरी​​​​* समूहाची विंडो चालू करा...त्यासाठी प्ले स्टोर वरून *कृषी किंग* अँप डाउनलोड करून घ्या आणि अँप चालू झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात *1101* हा कोड टाकावा.

अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..

​🌾 *होय आम्ही शेतकरी*🌾​

https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

*​कृषिकिंग*​ ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक...​

https://play.google.com/store/apps/details?id=com.reformist.krushiking001




कोई टिप्पणी नहीं: