src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"

शुक्रवार, 21 अक्तूबर 2016

Like no पोस्ट only शेतकरी

🌾होय आम्ही शेतकरी🌾

###  सिताफळ प्रक्रिया उद्योग ###

    सीताफळापासून बनवा पावडर, जॅम, रबडी सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेये, सिरप मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. गराचा वापर विविध मिठाई, बेकारी व कन्फेकशनरी मध्ये केला जातो. बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्य आहे. गर काढून साठविणे हा गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. या गोठविलेली सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गराची पावडर -अशा प्रकार तयार केलेली पाव आइस्क्रीम, कन्फेकशनरी तसेच श्रीखंड, मिल्कशेक, टाॅफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते. या पावडरला परदेशी बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे. 

गुणधर्म आणि उपयोग -
१) फळे तयार होण्यास फलधारणे पासून जाती परतवे १३५ ते १५० दिवस लागतात हे फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते म्हणून त्याची काढणी पुर्ण वाढीच्या वेळी करतात. 
२) डोळा पडलेली सीताफळे काढल्यास दोन तीन दिवसादिवसात पिकून खाण्यास तयार होतात. 
३) हे अत्यंत नाशवंत फळ आहे. पिकलयानंतर एक दोन दिवसादिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही. 
 ४) फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत असतो. पिकलेल्या सीताफळा मध्ये सर्वसाधारण पणे  ५०% गर २०% टीएसएस व ३०% आम्लता असते.
५) फळे अत्यंत नाशवंत असल्याने त्यांची दोन तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. गरामध्ये पोषणमूल्य चांगले असते. 
६) पानांचा लेप डोकेदुखीवर गुणकारी आहे. 
७) झाडांमध्ये हायड्रोसायनिक आम्ल असल्याने त्या झाडास वाळवी लागत नाही. 

प्रक्रिया पदार्थ - 
          १) गर आइसक्रीमसाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. गरापासून जॅम, जेली, पावडर, टाॅफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक इत्यादी पदार्थ तयार करता येतात. 
            २) गर नियमित सेवन केल्यास अशक्तपणा द्वर होती. 
            ३) पिकलेल्या फळाच्या सालीचा उपयोग जखमा बरया करण्यासाठी केला होतो. बियाचा लेप जनावरांच्या जखमा बरया करण्यासाठी केला जातो. ४) फळाचा गर शुक्रणृवर्धक, तृष्णावर्धक , बलवर्धक, उत्साहवर्धक , पचनशक्ती वाढविणारा व पित्ता विकार कमी करणारा आहे. हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी हदयाची कार्यक्षमता वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढते.
     
|| अन्नदाता सुखी भवः||

अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा...

🌾होय आम्ही शेतकरी🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

कोई टिप्पणी नहीं: