सोमवार, 19 दिसंबर 2016
सोमवार, 7 नवंबर 2016
दुनिया का पहला Bussiness जिसे आप facebook और whatsapp के द्वारा कर सकते हैं
🇮🇳Good News🇮🇳
🌐टोटली फ्री ज्वानिंग है...
🌐ना कुछ खरीदना है...
🌐ना कुछ बेचना है...
🌐ना किसी से पैसे लेना है...
🌐ना किसी को पैसे देने हैं...
🌐 घर बैठे ही करे बिजनेस...
🌐खाली समय का करे इस्तेमाल...
🌐 ना किसी के पास जाना है...
🌐ना कोई सेमीनार की फीस...
Withdrawal Options:-
बैंक ट्रान्सफर
मोबाइल रिचार्ज
"JOIN" लिखकर इस whatsapp no 9998064738 msg kare

शनिवार, 5 नवंबर 2016
बुधवार, 2 नवंबर 2016
एक मराठा लाख मराठा
ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !
शस्त्रास्त्र-शास्त्र पारंगत असं हे भोसले कुटुंब, याचा "शस्त्रास्त्र" चेहराच कायम जगासमोर मांडला गेला आणि याच मुळं शहाजी महाराजांपासून संभाजी राजांपर्यंत सगळ्यांचा "शास्त्र" व्यासंग झाकोळून गेलेला.
म्हणूनच या चित्रात तोच प्रसंग मांडलाय,
मध्यवर्ती बसले आहेत ते संभाजी महाराज, त्यांचा हातात त्यांनी स्वतः लिहीलेला ग्रंथ आहे "बुधभूषण". रायगडाच्या त्यांच्या ग्रंथालयात हा तेजपुंज युवराज घरच्यांसमोर स्वरचित ग्रंथाचं वाचन करतोय. चेहऱ्यावरचा करारी बाणा आणि विद्वतेची झाक सगळं सांगून जातेय. केवढा मंगलमय सोहळा असेल हा.
संभाजी महाराजांच्या उजव्या हाताला छत्रपती शिवराय बसले आहेत, चेहऱ्यावरचा कौतुक झाकता झाकेना महाराजांच्या. स्वराज्य ( साम्राज्य नाही) योग्य हातातच जाणार याची जाण अश्याच प्रसंगातून होत असेल थोरल्या राजांना. बापाच्या हाताला घट्ट पकडलेले चिमुरडे हात आहेत राजारामांचे. चार वर्षाच्या छोट्या राजारामांना थोरल्या दादाचं मोठं कौतुक, संभाजी दादाच्या पाठी सह्याद्रीच्या रांगडेपणाचं आणि शिवरायांच्या बाणेदारपणाचं बाळकडू राजारामांना आपसूक मिळतं होतं.
संभाजी महाराजांच्या डाव्या हाताला रयत माऊली जिजाऊ बसलीय. आयुष्यभर त्यागाची परिसीमा गाठलेल्या या साध्वीला आयुष्याच्या उतारवयात नातवाचा हा शास्त्रार्थ केवढा आनंद देऊन गेला असेल. त्यांच्या बाजूला बिलगून त्यांचा हात हातात घेऊन बसलेल्या आहेत त्या राजे भोसले घराण्याच्या सुनबाई, येसूराणी सरकार. जेमतेम १०-११ वर्षाचं वय त्यांचं, आऊसाहेबांच्या मायेचा उबदार स्पर्श आणि धन्याचं ग्रंथवाचन, भरून पावली असेल ती पोरं.
संभाजी राजांच्या आणि शिवरायांच्या मागे थांबून हा सगळं कौतुक सोहळा पाहत थांबल्या आहेत त्या शिवराज्ञी सोयराराणी, सईराणी सरकारांच्या अकाली मृत्यूनंतर संभाजी राजांचा आऊसाहेबांसंगती तळहाताच्या फोडाप्रमाणं सांभाळ केला तो याच माउलीनं. स्वतःचा मुलगा जेंव्हा ग्रंथकर्ता होतो, सर्वाना चौफेर थांबवून ग्रंथवाचन करतो. त्यावेळचा आनंद मांडायचा तो कोणत्या शब्दात? शब्दानांही पांगळं व्हायला होतं अश्यावेळी.
संभाजी महाराज आणि आऊसाहेबांच्या मागे थांबून या कौतुकसोहळ्याची साक्ष बनल्या आहेत त्या शिवछत्रपतींच्या राजकुमारी, राजकुवंर राणीसरकार आणि अंबिकाराणी सरकार. शिवरायांच्या मुली माझ्यामते पहिल्यांदाच एखाद्या चित्रांद्वारे जगासमोर आल्या असाव्यात. स्वतःच्या ज्या भावाला मांडीवर जोजावलं, ज्याच्या गालाला तीट लावून ज्याला कमरेवर घेऊन गडभर फिरवलं. तोच भाऊराया आज ग्रंथकर्ता झालाय याचा आभाळाएवढा आनंद कोणत्या पदराला संचित म्हणून बांधायचा? डोळ्यातले आनंदाश्रू थांबवायचे ते कोणती शपथ घालून?
या कौतुक सोहळ्याचे सच्चे जनक, शहाजी महाराज याकाळी हयात नाहीत. अश्या आनंदाच्या क्षणी त्यांची आठवण न होते तरंच नवल. बंगरुळ मुक्कामी त्यांनीच शिवरायांना शस्त्रविद्येपासून शास्त्रविद्यापर्यंत स्वतःच्या देखरेखीखाली पारंगत करून स्वराज्याची खूणगाठ शिवरायांना बांधून दिली. हा प्रसंग त्याचाच परिपाक. या भोसले कुटुंबाच्या पाठीशी चित्ररूपात महाबाहू शहाजी महाराजही दाखवले आहेत. त्यांना विसरण्याची चूक यापुढे करणे नाही.
~~~~~~~~~~~
चित्राचं स्थळ:- रायगडावरचं संभाजी महाराजांचं ग्रंथालय
~~~~~~~~~~~
चित्राचं साधारण वर्ष:- १६७४ चा पूर्वार्ध (राज्याभिषेकाच्या काही महिने आधी.)
~~~~~~~~~~~
चित्रातल्या व्यक्तिरेखा:- संभाजी महाराज (मध्यवर्ती), संभाजी महाराजांच्या उजव्या हाताच्या मंचकावर दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी राजे, त्यांच्या हाताला कवटाळून थांबलेले राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या डाव्या हाताच्या मंचकावर रयत माऊली जिजाऊ, त्यांचा हात पकडून बसलेल्या येसुराणी सरकार, संभाजी राजांच्या आणि शिवरायांच्या मागे थांबलेल्या शिवराज्ञी सोयराराणी, संभाजी महाराज आणि आऊसाहेबांच्या मागे थांबल्या आहेत त्या शिवछत्रपतींच्या राजकुमारी, राजकुवंर राणीसरकार आणि अंबिकाराणी सरकार.
~~~~~~~~~~~
चित्रकार:- दिनेश काची
~~~~~~~~~~~
चित्राचं औचित्य:- विघ्नहर्ता ग्रंथालयाचा दिपोत्सव
शब्दांकन - बोम्बल्या फकीर
☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

One like modi sar la
Some pictures from my visit to an exhibition on Sardar Patel and his life. The exhibition was very informative.
Talked about various facets of Sardar Patel’s personality- focus on women empowerment, his devotion to Gandhi Ji & administrative skills. Sardar Patel unified India. This unity in diversity is our strength. Highlighted ways our states can deepen collaboration & deepen bonds.
Whatever Sardar Patel did, it was for India. There was never any selfishness or promoting interests of his family. http://nm-4.com/dkjy
मंगलवार, 1 नवंबर 2016
गुरुवार, 27 अक्टूबर 2016
Like on post Barrera modi sar
Only Maratha
curl -H "public-api-token: 2b9e369437fef99773c62d05d82303ee" -X PUT -d "urlToShorten=google.com" https://api.shorte.st/v1/data/url
बुधवार, 26 अक्टूबर 2016
Like on post only Maratha
🌾होय आम्ही शेतकरी®🌾
🔘रोप पद्धतीने मिळेल ऊस उत्पादनात वाढ🔘
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
ऊसरोप पद्धतीने बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते. रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना शेत कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते. रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ होतात.
रोपवाटिकेत बडचीप (एक डोळा) पद्धतीने पॉली ट्रेमध्ये ऊस रोपनिर्मिती -
लागवडीच्या दोन डोळे टिपरी, तीन डोळे टिपरी, पॉली बॅग रोपे अशा विविध पद्धती आहेत. मात्र, रोप वाटिकेत बडचिप पद्धत सर्वांत प्रभावी आहे. यात बेणे खूप कमी लागते, उगवण चांगली मिळते. रोपांची निरोगी वाढ होते. वाहतूक सलग पद्धतीने करता येते.
🔘बडचीप निवड🔘
- सात ते नऊ महिने वयाच्या व दोन पेरामधील अंतर ७ ते ८ इंच असलेल्या भरीव जाडीच्या निरोगी उसाची निवड करावी.
- बडचिपर यंत्राच्या साहाय्याने बडचीप तयार करावी.
- बडचिपर हे यंत्र आडकित्यासारखे असून, त्याला लाकडी फळी, डोळा वेगळा करणारे धारदार पाते व हँडल असते. बडचिपरने ऊस डोळ्याचे नुकसान न होता ते व्यवस्थितरीत्या वेगळे करता येतात.
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
- बडचीप यंत्राने साधारणतः ताशी १५० पर्यंत चीप उसापासून काढता येतात. बडचीपमधील पाणी कमी होऊ नये म्हणून त्वरित सेंद्रिय व रासायनिक बेणेप्रक्रिया करून पॉली ट्रेमध्ये लागवड करावी.
🔘बेणे प्रक्रिया🔘
बेणे रोग व कीड मुक्त असावे. त्यासाठी त्यावर रासायनिक, तसेच जैविक बेणेप्रक्रिया करावी. सुरवातीस रासायनिक बेणेप्रक्रियेसाठी प्लॅस्टिक टबमध्ये १० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये मॅलॅथिऑन ३० मि.लि. आणि कार्बेन्डाझिम १० ग्रॅम मिसळून घ्यावे. तयार केलेल्या द्रावणात बडचीप १० मिनिटे बुडवावीत. जैविक बेणेप्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टर १ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू १२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बडचीप ३० मिनिटे बुडवून रोपनिर्मितीसाठी वापरावे.
🔘रोपवाटिकेची उभारणी🔘
- बडचीप पॉली ट्रेमध्ये आडवे न ठेवता डोळ्याचे टोक वर येईल, अशा पद्धतीने तिरकस ठेवावे. पॉली ट्रे कोकोपीटने भरून घ्यावे. पॉली ट्रेमध्ये पोकळी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोकोपीटमध्ये कोरडेपणा असल्यास हलके पाणी शिंपडावे.
- भरलेले ट्रे एकमेकांवर रचून ठेवावेत. सर्वांत वर रिकामा ट्रे ठेवावा. प्रत्येकी २५ ट्रे असलेले चार संच असे १०० ट्रे एकत्र घेऊन पॉलिथीन शिटमध्ये घट्ट व एकसंधपणे बांधून घ्यावे. अशापद्धतीने तयार बंडलावर छोटे वजन ठेऊन त्याच अवस्थेत ३ ते ५ दिवस ठेवावे, जेणेकरून योग्य आर्द्रता मिळून डोळे अंकुरू लागतील.
- ट्रेचे बंडल शेडनेटमध्ये ठेवले असेल तर पाणी, हवा, सूर्यकिरणे ट्रेमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोपे तयार करायची असतील तर बल्ब लावून उबदार वातावरण तयार करावे. योग्य वातावरणात ३ ते ४ दिवसांमध्ये पांढऱ्या मुळ्या फुटून बाहेर येतात. पुढील २ ते ३ दिवसांत कोंबही उगवून येतात.
- ५ ते ८ दिवसांत कोंब फुटलेले सर्व ट्रे पॉलिथीन शिटमधून बाहेर काढावेत. रोपवाटिकेतच जमिनीवर पसरलेल्या पॉलिथीन शिटवर ते वेगवेगळे ठेवावेत.
- कोकोपिटमधील ओलाव्याचे प्रमाण पाहून पुढील १५ दिवस संध्याकाळच्या वेळेस झारीने पाणी द्यावे.
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
- रोप सहाव्या पानावर असताना (सुमारे २० दिवसांचे) गरजेनुसार पाणी वाढवावे.
- ५ x २ फूट अंतरावरील एक एकर लागवडीसाठी ५००० बडचीप (५० कोन असलेले १०० ट्रे) लागतात.
🔘रोपांची पुनर्लागवड🔘
- १० ते १२ इंच खोलीपर्यंत नांगरणी करून जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी अधिकाधिक मुरते. शेवटच्या नांगरणीपूर्वी ४ ते ५ टन सेंद्रिय खत प्रतिएकरी वापरावे.
- रोपे २५ ते ३० दिवसांची असताना रोपवाटिकेतून शेतात पुनर्लागवड करावी.
- पुनर्लागवडीपूर्वी एक दिवसआधी रोपास पाणी बंद करावे. त्यामुळे ट्रेच्या कोनामधील कोकोपीट हलके व मोकळे होतात.
- झिगझॅग पद्धतीने पुनर्लागवड केल्यास रोपास वाढीसाठी भरपूर जागा मिळते, अधिक फुटवे मिळतात. वापसा असलेल्या शेतात रोपांची काळजीपूर्वक लागवड करावी. त्यासाठी दोन फूट अंतरावर खोऱ्याने किंवा टोकदार लाकडी दांडक्याने लहान खड्डे तयार करावेत. खड्ड्यात थोडे सेंद्रिय खत टाकावे. लागवडीनंतर रोपाच्या बुंध्याला चोहोबाजूने माती लावून हलके दाबावे किंवा सरीमध्ये ३ ते ४ इंच उभ्या पाण्यात रोप कोकोपीटसह लावून हलके दाबून घ्यावे.
- पुनर्लागवडीच्या १ ते २ दिवस आधी शेताला पाणी द्यावे. तसेच सऱ्या पाण्याने दोन तृतीयांश उंचीपर्यंत भरतील याची काळजी घ्यावी.
🔘रुंद सरी पद्धतीचा वापर🔘
- पारंपरिक पद्धतीत दोन ओळींतील अंतर ९० ते १०० सें.मी. (तीन ते सव्वातीन फूट) ठेवले जाते. त्यामध्ये ३ डोळे असलेले १२ ते १६ हजार टिपरे प्रतिएकरी लावले जातात.
- साधारणतः ३० ते ४० टक्के उगवण होऊनसुद्धा ३ ते ४ महिन्यांत शेतात फुटव्यांची संख्या एक लाखापर्यंत असते. मात्र, उसाची संख्या कमी होत तोडणीच्या वेळी गाळपयोग्य असे फक्त २५ ते ३० हजारच्या आसपास ऊस मिळतात.
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
- रुंद सरी पद्धतीत ५ x २ फूट अंतरावर लागवड केली जाते. सरी रुंद असल्यामुळे आणि रोपांचे अंतर २ फूट असल्याने उसाची वाढ व विस्तार होण्यास अधिक जागा मिळते. शेवटी गाळपयोग्य ४५ ते ५० हजारापर्यंत ऊस मिळतात.
- रोप व्यवस्थित वाढू लागल्यानंतर जमिनीपासून १ इंच उंचीवर विशिष्ट कात्रीने जेष्ट कोंब कापावा. त्यामुळे अधिकाधिक फुटवे व गाळप योग्य ऊस तयार होतो. या पद्धतीचा वापर सुरवातीला छोट्या क्षेत्रावर करावा. त्यानंतर यशस्वीता पाहून पूर्ण क्षेत्रावर वापर करावा.
🔘पाणी व्यवस्थापन🔘
- पिकाला संपूर्ण कालावधीत वाढीनुसार आवश्यक पाणी द्यावे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा पीक वाढ आणि जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
- पुनर्लागवडीनंतर पाण्याचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार, पिकाचे वय, पाऊस, हवामान, ओलावा अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. मुरमाड व हलक्या जमिनीत ७ ते १० तर भारी काळ्या जमिनीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- फुटव्यांच्या अवस्थेत (लागवडीपासून ३६ ते १०० दिवस) १० दिवसांतून एक वेळेस पाणी द्यावे. पिकाच्या जोमदार वाढीच्या काळात दर सात दिवसांनी पाणी द्यावे. नऊ महिने कालावधीपासून ते ऊस पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत १५ दिवसांनी एकदा पाणी द्यावे.
🔘एकात्मिक खत व्यवस्थापन🔘
- माती परीक्षणानुसार खतमात्रा द्याव्यात. संदर्भासाठी कृषी विद्यापीठांच्या खत मात्रा शिफारशींचा वापर करावा.
- रुंद सरी पद्धतीत आच्छादन, आंतरमशागत व बांधणीबरोबरच शिफारशीत खतांच्या मात्रा देणे शक्य होते.
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
- पीकवाढीची अवस्था आणि शिफारशीनुसार खते विभागून द्यावीत.
🔘सेंद्रिय खते🔘
- आडसाली उसासाठी हेक्टरी ३० टन शेणखत किंवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी ७.५ टन, प्रेसमड केक प्रतिहेक्टरी ६ टन आणि गांडूळ खत प्रतिहेक्टरी ५ टन द्यावे. ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.
- रासायनिक खतांच्या मात्रा चार हप्त्यांत विभागून द्याव्यात.
- आडसाली पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश यांचे चार हप्ते खालीलप्रमाणे द्यावेत ः
- लागवडीच्या वेळेस नत्र ४० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.
- ६ ते ८ आठवड्यांनी नत्र १६० किलो.
- १२ ते १६ आठवड्यांनी नत्र ४० किलो.
- मोठी बांधणीच्या वेळीस नत्र १६० किलो, स्फुरद ८५ किलो, पालाश ८५ किलो.
१) ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूंची बेणेप्रक्रिया केलेल्या उसावर हंगामनिहाय रासायनिक नत्र खत मात्रा ५० टक्क्यांनी तर स्फुरदाची मात्रा २५ टक्क्यांनी कमी करून द्यावी.
२) को-८६०३२ या ऊस जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची हंगामनिहाय खत मात्रा २५ टक्केने जास्त द्यावी. अन्यथा ऊस बारीक पोसतो.
🔘सूक्ष्म अन्नद्रव्ये🔘
माती परीक्षणानुसार सूक्ष्मखतांच्या मात्रा द्याव्यात. सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनिज सल्फेट आणि ५ किलो बोराक्स प्रतिहेक्टरी कुजलेल्या शेणखतात (१०ः१ प्रमाणात) दोन दिवस मुरवून सरीत द्यावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक व दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागत नाही.
डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
🔘सुधारित ऊस रोप लागवडीचे फायदे🔘
- बेण्याची बचत होते. एकरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते.
- पॉली ट्रेमध्ये रोपे तयार केल्याने पुनर्लागवडीसाठी लहान रोपांची वाहतूक सोपी होते.
- गाळपयोग्य उसाची संख्या जास्त, प्रत्येक उसाचे वजन व प्रत वाढते.
- हवा व सूर्यप्रकाश यांची उपलब्धता वाढते.
- रोप पुनर्लागवडीपर्यंत एक ते दीड महिना उसाचे शेत मशागतीसाठी किंवा कमी अवधीच्या पिकासाठी वापरता येते.
- उत्पादन खर्चात बचत, रुंद सरी पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे सुलभ.
- भरणी केल्यामुळे पिकाच्या मुळांना आधार मिळून ते जमिनीवर लोळत नाही.
- रासायनिक व सेंद्रिय अशा दोन्ही प्रकारच्या खतांचा संतुलित वापर.
- आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्न.
- लागवड खर्चात २० ते ३० टक्के, मजूरसंख्येत २० ते ३० टक्के बचत.
- पाणी वापराची कार्यक्षमता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते. पाण्याची ४० ते ७०टक्के बचत.
- उत्पादनात २० ते ५० टक्के वाढ.
📝डॉ. दत्तात्रय मुरूमकर, ओमप्रकाश हिरे व डॉ. विजय अमृतसागर
☎संपर्क : ओमप्रकाश हिरे 7588015491
📚 माहिती संदर्भ अग्रोवन
|| अन्नदाता सुखी भवः ||
अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा
🌾होय आम्ही शेतकरी®🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866
Like on post only Maratha
कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे
www.kas.ind.in
हे संकेतस्थळ आहे.
कास पठार हे वर्ड हेरिटेज कमिटीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेलया पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. 21 देशांच्या सभासदासमोर पश्चिम घाटाला जागतीक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. त्यातील कास पठार हे फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थाचा मोठा वाटा आहे. कास पठाराची समुद्रसपाटी पासूनच उंची 1213 मिटर असून पर्जन्यमान अंदाजे अडीच ते तीन हजार मि.मी. इतके आहे. कास पठार हे 1792 हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची 1142 हेक्टर तर खाजगी 650 हेक्टर जमीनीचा समावेश आहे.
कास पुष्प पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे. तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणाऱ्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठरावरुन सुक्ष्म हवामान हे जैविक घडामोंडीना उत्क्रांतीला पोषक आहे. कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो.
कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते, हेच ते ऐतिहासिक प्रसिध्द कास पठार आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होतो. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.
महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 1213 मीटर एवढी आहे. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती व अन्य द्रव्य असलेले पठार आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोहात पाडते.
कास पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे 850 पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.
जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात. तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटोन सातारन्सीस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही. पण पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच मोह टाळून या निसर्गदत्त पुष्प पठाराचे नजरेत संकलन करावे.
श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
कास पुष्प पठारातील जैव विविधा जोपासण्यासाठी पयर्टकांबरोबरच सर्वांनीच स्वत:वर बंधने घालून घेणे गरजेचे आहे. कास पठारावरील विविध जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी या परिसरात तार कुंपन उभारण्यात आले असून या पुष्प पठारावर प्रवेश शुल्कही आकारलाही जात आहे. कास संरक्ष्ण समितीच्या वतीने प्रति माणसी 10 रुपये प्रमाणे प्रवेश शुल्क (12 वर्षावरील )आकारले जाते. प्रवेश शुल्क आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून यासाठी
www.kas.ind.in
या संकेतस्थळावर माहिती मिळेल तसेच
forst.satara68@gmail.com
या ई-मेल आरक्षणाबाबत संपर्क साधावा. याबरोबरच वाहनांमुळे वाहुक व्यवस्था कोलमोडूनये म्हणून ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीत सातारा ते बामणोली रस्त्यावरील कास पठार 15 ते 21 किलोमिटर व राजमार्ग फाटा 0 ते 6 किलो मिटर अंतरात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत वाहनांना थांबण्यास रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या परिसरात सर्व वाहनांना बंदी केली आहे.
काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्यासाठी तर अलीकडील काही वर्षात मोठया प्रमाणावर पर्यटक नियमितपणे कास पठारला भेट देतात. एकंदरीत सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांना भुरळ घालणाने पुष्पसौदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे. त्यामुळेच कास पुष्प पठार हे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरत आहे.
Like on post Shiv Chatrapati Jai Bhavani Jai Shivaji
छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्र यांचा संबंध काय असा गैरवाजवी प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी आज्ञापत्रातील शिवरायांचे " ज्याचे आरमार त्याचा समुद्र " हे वाक्य समजून घ्यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काही खालील नोंदी पाहुन घ्याव्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार लहान असले तरी या आरमारात लहान मोठी चार-पाचशे जहाजे होती, गुराबा, तारवे, गलबते, शिबाडे अश्या नाना जातीय जहाजे होती आणि महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचीच काही उदाहरणे-
● का. मिंचिन २२ सप्टेंबर १६७९ ला मुंबई कौंसिलला लिहतो की - खांदेरी बेटावरील लोंकाना आमच्या तोफापासून काही इजा होणार नाही याउलट आमचेच नुकसान जास्त होणार आहे
● २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही
● केजविन लिहतो की २८ ऑक्टोंबरला शत्रुच्या होड्या आमची नजर चुकवून कितीही काळजी घेतली तरी बेटावरील दिव्यांच्या खालून सहज निघून जातात तोच परत १ नोव्हेंबर ला लिहतो की शिवरायांचे आरमार इतके चपळ आहे की ते आमच्या पुढून सहज जातात कारण त्यांच्या लहान होडग्या आम्हाला सहज आणि आश्चर्यरीत्या चुकवतात.
छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती..
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो

Like no post only शेतकरी
🌾 *होय आम्ही शेतकरी* 🌾
*_सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान_*
*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*
गहू हे रब्बी हंगामातील महत्वाचे अन्नधान्याचे पीक आहे...भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (3120 किलो/प्रति हेक्टर) तुलना करता महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन 1461 किलो प्रति हेक्टर एवढेच आहे.. नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवण्याची आज गरज आहे... सदरच्या लेखात आपण या बाबींवर माहिती घेऊ..
*जमीन-*
बागायती गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माध्यम जमिनीत भारखते आणि रासायनिक खते वापरल्यास चांगले उत्पादन भेटू शकते. जिरायत गहू जास्त पाऊस पडणाऱ्या आणि ओलावा टिकून धरणाऱ्या जमिनीत घ्यावा..
*सुधारित वाण-*
NIAW-301(त्र्यंबक), NIAW-917(तपोवन) NIAW- 1914 (समाधान) हे सरबती वाण आणि NIDW-215 (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावेत. बागायती उशिरा पेरणीसाठी NIAW- 34 या वाणाची लागवड करावी. जिरायत पेरणीसाठी NIDW-15 (पंचवटी) AKDW-2997-16 (शरद) हे वाण उपयुक्त आहेत..
*_पेरणीची वेळ-_*
*जिरायत गव्हाची पेरणी* ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवढ्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची वेळ म्हणजे नोव्हेबरचा पहिला पंधरवढा होय. या वेळेत पेरणी केल्यास उत्पादन चांगले भेटते..
बियाणे व बीजप्रक्रिया
बागायती गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे..जिरायती गव्हाच्या पेरणीसाठी हेक्टरी 75 ते 199 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे..गव्हाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी 20 ते 22 लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे..
पेरणिपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी..तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम Azotobactaor व पीएसबी २५० ग्रॅम या जिवाणू सवर्धकांची खताची बीजप्रक्रिया करावी..
*पेरणी-*
बागायती गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २०सेमी, व उशिरा पेरणीसाठी १८ सेमी ठेवावे.. जिरायत गव्हाची पेरणी करताना दोन ओळीतील अंतर २० सेमी ठेवावे..
*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*
*_खत व्यवस्थापन_*
*बागायती गहू-*
१२०:६०:४० किलो npk द्यावे(प्रति हेक्टर). निम्मे नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेराणीवेळी द्यावे व उरलेले नत्र ३ आठवड्यानी खुरपणी झाल्यावर द्यावे..
*जिरायत गहू*
४०:२०:० किलो npk हेक्टरी द्यावे.. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 2% यूरिया ची फवारणी करावी.
*पाणी व्यवस्थापन*
माध्यम ते भारी जमिनीत ४ ते ५ पाण्याच्या पाळ्यात पीक निघते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते त्या खालील प्रमाणे
मुकुट मुळे फुटण्याची अवस्था- पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
कांडी धरण्याची अवस्था- पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
फुलोरा आणि चिक भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ६० ते ६५दिवस
दाने भरण्याची अवस्था- पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
*अंतर मशागत*
गव्हातील तणांच्या नियंत्रणासाठी जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी हेक्टरी आयसोप्रोट्युरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेट सल्फ्युरॉन मेथाईल (२०%) हेक्टरी २० ग्रॅम किंवा २,४ डी (सोडियम)अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून २ ओळीत फवारावे.
*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*
*_पीक संरक्षण:_*
*तांबेरा:*
गहू या पिकावर काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहेत. नियंत्रणासाठी तांबेरा प्रतिबंधक जातींची लागवडीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक म्हणून गव्हाची पेरणी वेळेत करावी. तांबेरा दिसू लागताच मन्कोझेब हे बुरशीनाशक हेक्टरी १.५ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जरुरी भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्लूजी ५० ग्रम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*कापणी व मळणी:*
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस जास्त उशीर झाल्यास त्रंबक या वाणाचे दाने झडू शकतात. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५% असावे.
*उत्पादन:*
बागायती वेळेवर केलेली लागवड : ४५ ते ५० क्विंटल
बागायती उशिरा केलेली लागवड: ३५ ते ४० क्विंटल
जिरायत लागवड : १२ ते १४ क्विंटल
*श्री. अंकुश चोरमुले*
*श्री. विनायक शिंदे-पाटील*
*श्री. अमोल पाटील*
*|| अन्नदाता सुखी भवः ||*
अश्याप्रकारची शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कृषिकिंग हे ॲप इंस्टॉल करून
*होय आम्ही शेतकरी* समूहाची विंडो चालू करा...त्यासाठी प्ले स्टोर वरून *कृषी किंग* अँप डाउनलोड करून घ्या आणि अँप चालू झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात *1101* हा कोड टाकावा.
अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा..
🌾 *होय आम्ही शेतकरी*🌾
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866
*कृषिकिंग* ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक...
https://play.google.com/store/apps/details?id=com.reformist.krushiking001
सदस्यता लें
संदेश (Atom)